EPFO: PF Nomination शिवाय आता हेही करता येणार नाही

0

PF Nomination: PF खातेदारांना ई नामांकन करावे लागणार आहे, अन्यथा नंतर मोठी समस्या निर्माण होईल. पीएफ खातेदारांना नॉमिनीचे नाव ॲड ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. तुम्ही नॉमिनी तपशील विहित वेळेत अपडेट न केल्यास अनेक सुविधांवर पाणी सोडण्याची वेळ येईल.

आता खातेधारक ई-नॉमिनेशनशिवाय पीएफ पासबुक पाहू शकणार नाहीत. आतापर्यंत तसे करण्याची गरज नव्हती. पण, आता पीएफ खात्यातील बॅलन्स तपासण्यासाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य आहे. खातेधारक आतापर्यंत ई-नॉमिनेशन न करताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन पीएफ बॅलन्स आणि पासबुक सहज तपासू शकत होते.

EPFO PF खाते वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात अनेक नामांकित व्यक्तींची नावे ॲड करण्याची परवानगी देते. याशिवाय कोणत्या नॉमिनीला किती शेअर मिळावा हे सदस्य निवडू शकतात. नॉमिनीच्या जन्मतारखेसोबत हे देखील सांगावे लागेल की पीएफ खात्यात किती टक्के रक्कम जमा केली जाईल. जर नॉमिनी अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकाचे नाव आणि पत्ता देणे आवश्यक आहे. नॉमिनी व्यक्तीची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे.

नॉमिनी अपडेट करणे किंवा नव्याने जोडण्याचे आॕनलाईन स्वरुपात केले जाऊ शकते. यासाठी केवळ UAN नंबर असणे आवश्यक ठरणार आहे. तसेच आधार क्रमांक अकाउंट क्रमांकाला संलग्नित असणे अनिवार्य आहे.

असे करा PF Nomination

–EPFOच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या https://www.epfindia.gov.in/site_en/index.php

-‘लॉग-इन’ नंतर पाहा (View) पर्यायावर जा

-प्रोफाईल वर क्लिक करा

-तुमच्यासमोर दिसणारी सर्व माहिती पडताळा

-व्यवस्थापित करा (Manage) पर्यायावर जा

-ई-नॉमिनेशन पर्यायावर क्लिक करा

-आवश्यकतेप्रमाणे तपशील भरा

-माहितीपूर्ण भरल्यानंतर अस्वीकरणचा पर्यायावर क्लिक करा. कौटुंबिक तपशीलाचे पान उघडले जाईल

-नॉमिनीचे नाव,पत्ता, संपर्क, वय, बँक तपशील,नातेसंबंध, फोटो याप्रमाणे माहिती सादर करा.

-तुम्ही एकाधिक नॉमिनी जोडू इच्छित असल्यास (Add new) वर क्लिक करा

-संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ‘सेव्ह करा’ वर क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here