लखनऊ,दि.20: उत्तर प्रदेशातील बदायूंमध्ये एका व्यक्तीने तीन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला, तर तिसरा मुलगा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी आरोपी साजिदला चकमकीत ठार केले आहे. साजिद जेव्हा मुलांना मारण्यासाठी घरात घुसला तेव्हा त्याने त्यांच्या आईकडून पैसे उसने मागितल्याचे समोर आले आहे.
ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉलनीत घडली. मंडी पोलीस चौकीपासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. मंगळवारी सायंकाळी उशिरा साजिद नावाचा व्यक्ती त्याच्या दुकानासमोरील विनोद सिंह यांच्या घरात घुसला. यावेळी त्याने विनोदच्या पत्नीकडे पाच हजार रुपयांची मागणी केली.
क्लेचर मुलांची आई संगीता म्हणाली, “मी माझ्या घरात कॉस्मेटिकचे दुकान चालवते आणि वर माझे पार्लरचे दुकान आहे. संध्याकाळी साजिद घरी आला आणि मी आधी त्याला क्लचर्स मागितले, जे त्याने दिले आणि नंतर काही वेळाने, त्याने 5000 रुपये मदत मागितली.मी माझ्या पतीशी बोलून 5000 रुपये दिले. त्यानंतर त्याने तब्येत ठीक नसल्याचे सांगून तो घरात वरच्या मजल्यावर गेला. गच्चीवर दोन मुले आयुष आणि युवराज होती. मुलांच्या आजीने सांगितले की, साजिदने हनीला पाण्यासाठी बोलावले होते. हनी पाणी घेऊन वरच्या मजल्यावर गेला होता आणि काही वेळाने किंचाळण्याचे आवाज येऊ लागले आणि साजिद हातात मोठा चाकू घेऊन रक्ताच्या थारोळ्यात उतरत होता.”
मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला
मुलांच्या आजीने सांगितले की, सायंकाळी उशिरा न्हाव्याचे दुकान चालवणाऱ्या एका व्यक्तीने घरात घुसून आयुष, युवराज आणि आहान उर्फ हनी या तीन मुलांवर कुऱ्हाडीने वार केले. ज्यामध्ये आयुष (12) आणि अहान (6) यांचा मृत्यू झाला आहे, तर युवराजला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याला उपचारानंतर घरी पाठवण्यात आले.
या घटनेने संतप्त कुटुंबीय व ग्रामस्थांनी एकच गोंधळ घातला. आरोपी साजिदच्या दुकानाला आग लावली आणि त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. एसएसपीसह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला आणि गर्दीवर नियंत्रण मिळवले.
बरेली झोन आयजींनी दिली माहिती
बरेली झोनचे आयजी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, दोन मुलांची निर्घृण हत्या करताना रक्ताने माखलेला आरोपी साजिद घटनास्थळावरून पळून गेला. आमच्या पथकाला त्याची माहिती मिळताच त्याचा पाठलाग केला असता तो शेकुपूरच्या जंगलात दिसला. आमचे एसओजी आणि पोलिस त्याचा पाठलाग करत तिथे पोहोचले तेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी होऊन मरण पावला.