Eknath Shinde Latest News: दीपक केसरकर यांनी सांगितले बंडखोर शिवसेना आमदारांचा खर्च कोण करतयं

0

दि.25: Eknath Shinde Latest News: आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले बंडखोर शिवसेना आमदारांचा खर्च कोण करत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर शिवसेनेचे 38 पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. अनेकांना प्रश्न पडतो की या सर्व आमदारांचा खर्च कोण करत आहे? सर्व आमदार हे सध्या गुवाहटीत आहेत. शिवसेनेचे व अपक्ष असे सर्व आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ पाहायल मिळत आहे. शिंदे गटासोबत तब्बल 42 आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी, गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतो, यासंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. 

आमदारांना चांगला पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे. पण, आम्ही अधिकृतपणे त्याचा खर्च भरतो, कन्सेशन घेतो. मात्र, पैसे भरुनच आम्ही इथं राहतो, मोफत राहत नाही. कुठलाही पक्ष आमचा खर्च करत नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बोलावलं, त्यांनी सांगितलं या फ्लाईटने या, आम्ही गेलो. जे काही पेमेंट असेल ते आम्ही करतो, असे दिपक केसरकर यांनी स्पष्ट केले. तसेच, तुम्हाला का वाटतं की भाजपच यामागे आहे, तसं नाही भाजप यामागे अजिबात नाही, असेही त्यांनी सांगितले.

एकत्र राहिले पाहिजेमी राष्ट्रवादीतच होतो, माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, माझ्या एकट्याचे संबंध असून काय उपयोग. आमचे आमदार राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलचे गाऱ्हाणे आमच्याकडे मांडत होते. मी कोकणात एवढी मोठी लढाई केली. मलासुद्धा पंतप्रधान कार्यालयातून बोलाविण्यात आलं होतं. मी का नाही गेलो, कारण मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना लढते. मी दिल्लीवरुन एवढ्या मोठ्या माणसाला न भेटता परत आलो. विशेष म्हणजे मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुखांना सांगत आहे की, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रच राहिलं पाहिजे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here