Eknath Shinde Raj Thackeray: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन

0

मुंबई,दि.27: Eknath Shinde Raj Thackeray: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना फोन करून चर्चा केली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे खिंडार पाडले आहे. 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहेत. वेगळा गट बनविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी त्यांच्यासोबत असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करू शकेल. त्यादृष्टीने पडद्याआड जोरात हालचाली सुरू आहेत.

मनसेत प्रवेश केल्यास

दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांचा गट मनसेमध्ये प्रवेश करेल. जेणेकरून त्यांची आमदारकी कायम राहील. 

शिवाय राज ठाकरे त्यांच्या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरतात. त्यांचे नाव वापरतात. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केलेला आहेच. त्यामुळे हे सगळे फायद्याचे ठरेल, असे एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यात आल्याचे समजते.

मात्र या राजकीय घडामोडी आणि न्यायालयीन लढाईच्या तयारीदरम्यान बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा फोन काल थेट ‘शिवतिर्थ’वर गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी शिंदेंनी त्यांना फोन केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना रविवारी फोन केला. राविवारी सायंकाळी एकनाथ शिंदेंनी राज यांच्या प्रकृतीची चौकशी केली. शिंदे आणि राज यांच्यामध्ये काही मिनिटं प्रकृतीसंदर्भातील चर्चा झाली. राज यांना शनिवारी रुग्णालयामध्ये डिस्चार्ज देण्यात आलाय. शस्त्रक्रियेनंतर राज शनिवारी घरी परतल्याचं त्यांनीच ट्विटरवरुन जाहीर केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी थेट राज यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन प्रकृतीसंदर्भातील माहिती घेतली. तसेच राज यांची या दुखण्यापासून लवकर सुटका व्हावी अशा शुभेच्छाही शिंदेंनी दिल्याचं समजतं. या फोन कॉलदरम्यान राजकीय चर्चा झाली नाही असं सांगण्यात आलंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here