Eknath Khadse: राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का

Eknath Khadse News: मंदाकिनी खडसे यांचा जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत पराभव

0

जळगाव,दि.11: Eknath Khadse News: राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांचा जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (Jalgaon Zilla Dudh Sangh Election) पराभव झाला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण यांनी मंदा खडसे यांचा 76 मतांनी पराभव केला आहे. याबाबतची माहिती विजयी उमेदवार मंगेश चव्हाण यांनी स्वतः दिली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार भाजप-शिंदे गट आघाडीवर आहे, तर एकनाथ खडसे यांचा गट पिछाडीवर आहे.

Eknath Khadse News: जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. आता, या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. हाती आलेल्या निवडणूक निकालात खडसे परिवाला मोठा धक्का बसला असून एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा पराभव झाला आहे. 

Eknath Khadse News: जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक निकाल

दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार 19 पैकी 16 जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदे आणि भाजप गटाची विजयाकडे वाटचाल सुरू आहे. एकनाथ खडसे यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरात भाजपचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी आव्हान दिले होते. यात मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here