‘ही लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे…’ सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड

0

नवी दिल्ली,दि.6: चंदीगड महापौर निवडणूक व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त करत “आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही लोकशाहीची हत्या करण्यासारखे आहे. ही लोकशाहीची चेष्टा आहे. रिटर्निंग अधिकाऱ्याचे हे वर्तन अयोग्य आहे असे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले.

चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत मतपत्रिकांशी छेडछाड करण्याचा झालेला प्रकार ही लोकशाहीची थट्टा आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या निवडणुकीशी संबंधित असलेल्यांना सुनावले आहे. सदर निवडणूक प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग व मतपत्रिका जतन करून ठेवण्यात याव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

आम आदमी पक्षाच्या नगरसेवक व आप-कॉंग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत गैरप्रकार झाला असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. याचिकेत भाजपचे नवनिर्वाचित महापौर मनोज सोनकर यांची हकालपट्टी करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चंडीगड महापालिका, त्यातील अधिकारी यांना समन्स बजावले आहे. 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने महापौर निवडणुकीच्या प्रक्रियेचा व्हिडीओ बघितला. त्यानंतर परखड मते व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले आहे. महापौरांच्या निवडणुका नीट पार पाडणे सर्वात महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here