दि.२६: युनिलीव्हरने Dove सहित एयरोसोल ड्राय शॅम्पूसहित अनेक प्रसिद्ध ब्रॅँड्सची उत्पादनं बाजारातून परत मागवली आहेत. कंपनीच्या अनेक शॅम्पू उत्पादनांमध्ये बेंजीन नावाचं एक धोकादायक रासायनिक द्रव्य आढळलं आहे, ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. अमेरिकेत ही कारवाई करण्यात आलेली असून कंपनीने Dove, Nexxus, Suave, Tigi आणि Tresemme एयरोसोलसहित अमेक ड्राय शॅम्पू अमेरिकेतील बाजारातून परत मागवले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाने आपल्या वेबसाईटवर नोटीस जारी केली असून त्यानुसार, Nexxus, Suave, Tigi या ब्रँडचा यामध्ये समावेश आहे जे रॉकहोलिक आणि बेड बेड ड्राय शॅम्पूचं उत्पादन करतात.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, युनिलीवरने ऑक्टोबर २०२१ च्या आधीची सर्व उत्पादनं परत मागवली आहेत. या वृत्तामुळे पुन्हा पर्सनल केअर उत्पादनांच्या सुरक्षेसंबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. गेल्या दीड वर्षात एयरोसोल सनस्क्रीन ज्याप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनच्या न्यूट्रोगेना, एडजवेल पर्सनल केअर कंपनीच्या बनाना बोटसंबंधीही अशा बातम्या समोर आल्या आहेत. रिपोर्टनुसार, प्रॉक्टर अँड गॅम्बल (P&G) कंपनीने बेंजीनचं मिश्रण असल्याचा हवाला देत आपले पँटीन आणि हर्बल एसेंस ड्राय शॅम्पू परत मागवले होते.
ड्राय शॅम्पू हे स्प्रेप्रमाणे असतात. आपले केस ओले न करता ते स्वच्छ करण्यासाठी अशा प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. स्प्रे-ऑन ड्राय शॅम्पूवर प्रश्चचिन्ह उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. युनिलीवरने आपल्या उत्पादनांमध्ये बेंजीनचं प्रमाण किती आहे याबाबत माहिती दिलेली नाही, मात्र आपली सर्व उत्पादनं परत मागवली आहेत.
सतत बेंजीनच्या संपर्कात आल्याने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचं अन्न व औषध प्रशासनाने सांगितलं आहे. यामुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.