महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करीच्या 5.7 कोटी रुपयांच्या सिगारेट कांड्या केल्या जप्त

0

मुंबई,दि.29: महसूल गुप्तचर संचालनालयाने तस्करीच्या 5.7 कोटी रुपयांच्या सिगारेट कांड्या जप्त केल्या आहेत. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळालेल्या माहितीनुसार,उरण येथील न्हावाशेवाच्या जवाहरलाल नेहरू बंदरात आलेला 40 फूट लांबीचा वातानुकूलित कंटेनर, न्हावा शेवा येथील ‘कंटेनर फ्रेट स्टेशन’ (CFS) अर्थात कंटेनर हाताळणी केंद्रात तपासणीसाठी काही काळ थांबवून ठेवण्यात आला.

कंटेनरमधील मालाची सखोल तपासणी केल्यावर, सिगारेटच्या कांड्या पुठ्ठ्याच्या खोक्यात कल्पकतेने लपवल्या असल्याचे आढळून आले. या खोक्यात, सागरी मालवाहतुकीच्या दस्तावेजात माल म्हणून चिंच भरली आहे, असे नमूद केले होते. सिगारेटच्या कांड्यांची पाकिटे मधल्या बाजूला ठेवण्‍यात आली होती. मालाचे खोके चहूबाजूने चिंचेने झाकली होती आणि चिंचेचा खोका उघडल्यानंतरही आतील सिगारेटस दिसणार नाहीत अशा पद्धतीने मोठ्या चतुराईने सिगारेटच्या कांड्या ठेवण्यात आल्या होत्या.

तस्करीच्या या मालामध्ये 33,92,000 सिगारेटच्या कांड्या असून त्यांचे बाजार मूल्य अंदाजे 5.77 कोटी रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here