सोलापूर,दि.२०: Dr. Shirish Valasangkar | डॅा. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रसिद्ध न्युरोसर्जन डॅा. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी (दि.१८) आत्महत्या (Shirish Valasangkar Suicide) केली होती. स्वतःवर गोळी झाडून घेत डॅा. वळसंगकर यांनी आत्महत्या केली होती. तणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. स्वतःचे चार्टर्ड प्लेन (विमान) असलेले डॉक्टर अशी त्यांची ओळख होती.
डॅा. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॅा. वळसंगकर यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचं पुढे येत आहे. त्या चिठ्ठीमध्ये डॉक्टरांनी एका महिलेवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानुसार पोलिसांनी महिलेला कोर्टाच्या परवानगीने अटक केली आहे.
डॉ. वळसंगकर यांनी एक चिट्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉ. शिरीष वळसंगकर केलाय.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने काम करत होत्या.