नवी दिल्ली,दि.३: Dr Ravi Godse On Corona Third Wave In India: अनेक देशात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने (Omicron Variant) धुमाकूळ घातला आहे. अनेक देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. भारतातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आताच्या घडीला ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्णांची संख्या आढळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे देशभरातील राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर निर्बंध घालणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. यातच अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे यांनी मोठा दिलासा देणारी माहिती दिली आहे. भारतात कोरोनाची तिसरी (Corona Third Wave) लाट येणार नाही, असे म्हटले आहे. हा दावा करताना डॉ. रवी गोडसे (Dr Ravi Godse) यांनी काही कारणे सांगितली आहेत.
कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) भारतात येण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण कोरोना किंवा ओमिक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. देशभरातील रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण प्रचंड वाढते, तेव्हाच कोरोनाची लाट आली, असे म्हणता येते, असे रवी गोडसे यांनी सांगितले. रवी गोडसे यांनी एक ट्विट केले असून, काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहितीही दिली आहे.
लक्षणे नसणाऱ्यांनी टेस्टिंग करू नये
बऱ्याच जणांना जरी कोरोना किंवा ओमायक्रॉनची लागण झाली, तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे ज्यांना लक्षणे नाहीत, त्यांनी चाचणी करुच नये, असेही रवी गोडसे यांनी म्हटले आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. तरीही लसीकरणावर आणखी भर देण्याची गरज आहे, असे डॉ. गोडसे म्हणाले. ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना ओमिक्रॉनने सीरीयस होण्याचा धोका ६० टक्क्यांनी कमी असतो. तर ज्यांनी तीन डोस घेतले आहेत, त्यांना ८१ टक्क्यांनी धोका कमी असतो. ओमिक्रॉन संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता ८१ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशी माहिती डॉ. रवी गोडसे यांनी दिली.
दरम्यान, रवी गोडसेंनी काही दिवसांपूर्वीच ओमिक्रॉन म्हणजे नॉनसेंस! असे ट्विट केले होते. आता त्यांनी ओमिक्रॉन ही वाईट बातमी! असे ट्विट केले आहे. परंतू ही वाईट बातमी आपल्या कोणासाठी नसून ती डेल्टासाठी आहे. असे ते म्हणत आहेत. रवी गोडसे यांनी NDTV India चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येणार नाही, कारण ओमायक्रॉन हा मोठा झिरो ठरणार आहे, म्हणजेच काहीच होणार नाही, असे गोडसे यांनी म्हटले होते. कोरोनाच्या आधीच्या व्हेरिअंटला गंभीरतेने घेणारे गोडसे यांनी ओमायक्रॉनला सुरुवातीपासून हलक्यात घेतले आहे. ओमायक्रॉन हा शक्तीहीन व्हायरसचा व्हेरिएंट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांचीच री अन्य तज्ज्ञ ओढू लागले आहेत.