उजनी धरणातून सायंकाळपासून भीमेत १६ दरवाजातुन २५ हजार क्युसेकचा विसर्ग

0

विनायक दीक्षित/कुर्डुवाडी दि.१०: सोलापूर जिल्ह्याची वरदायनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन चालू असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणे शंभरी ओलांडली असुन शनिवारी रात्री नऊ वाजता धरणाच्या चार दरवाजातुन भीमा नदी पात्रात ५ हजार क्यूसेक्सने पाणी सोडण्यास सुरवात झाली व नंतर त्यात रवीवार दि १० रोजी सायंकाळी चार वाजल्यापासुन उजनीच्या १६ दरवाजातुन २५ हजार क्यूसेक्सने पाणी भिमानदीत सोडण्यात आले आहे चालू वर्षी पावसाळी हंगामात ५ ऑक्टोंबर रोजी उजनी धरण १०० टक्के भरले आहे. तर सध्या उजनी धरणाचा पाणीसाठा १०८.३१ टक्के झाला असुन सध्या दौड येथुन उजनीत येणार्‍या पाण्याची आवक वाढत आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार यात कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडुन देण्यात आली आहे. दरम्यान नीरा खोऱ्यातील वीर धरणातून सुद्धा नीरा नदीत 5 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला जात आहे. उजनी धरण परिसरात शनिवारी सायंकाळ पासूनच दमदार पाऊस चालू असल्यामुळे नीरा व भीमा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनीतून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात पावसाच्या प्रमाणानुसार वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

छायाचित्र – सोपान ढगे, टेंभूर्णी

शनिवारी दिवसभर व रविवारी पहाटेपर्यंत पुणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंडमधून येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ झाल्याने उजनी धरणांमधून २५ हजार क्युसेकचा विसर्ग रविवारी दुपारपासुन चालु केला आहे.
दरम्यान उजनीचे २५ हजार क्युसेक विसर्ग व निरामधून येणारा ५ हजार विसर्ग मिळून निरा-भिमा संगमात येणारा विसर्ग तब्बल ३० हजारांचा होत असल्यामुळे भिमानदीत पाणीपातळी वाढत चालली आहे.
त्यामुळे प्रशासनाकडून भिमाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

□ सध्या उजनी धरणातील पाणीपातळी

१०/१०/२०२१
सायं सहा वा.

एकूण पाणीपातळी – ४९७.२६० मीटर

*एकुण पाणीसाठा – १२२.४२ टी.एम.सी.
*उपयुक्त साठा – ५८.७६ टी.एम.सी.
*टक्केवारी – १०९.६८ टक्के
*दौंड विसर्ग – १४७५० क्यूसेक
*बंडगार्डन – ८७२१ क्यूसेक
कालवा -७०० क्युसेक
बोगदा – २०० क्युसेक
वीज निर्मिती – बंद
नदी विसर्ग – २५,००० क्युसेक


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here