सोलापूर,दि.12: Dhirendra Krishna Shastri Video: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज सध्या देशपातळीवर चर्चेत आहेत. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज लोकांच्या मनातल्या गोष्टी ओळखत असल्याचा दावा केला जातो. त्यानुसार त्यांचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. त्यांच्या चमत्काराचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. आता परत एकदा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी एका महिलेच्या पतीच्या खुनाचा उलगडा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये राहणाऱ्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या म्हटले आहे, पण महिलेला संशय आहे की, तिच्या पतीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे महिलेने गेल्या 4 वर्षांपासून आपले केसही धुतलेले नाहीत. ही महिला धीरेंद्र शास्त्री यांच्या दिव्य दरबारात जाते. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री लोकांमधून याच महिलेला हाक मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
पतीच्या हत्त्या झाली…| Dhirendra Krishna Shastri Video
ती महिला धीरेंद्र शास्त्री यांच्या जवळ येते, यावेळी तिने आपल्या पतीचा फोटोही सोबत आणला आहे. महिला स्टेजवर आल्यावर धीरेंद्र शास्त्री कागदावर त्या महिलेविषयी काहीतरी लिहितात. यानंतर शास्त्री महिलेला सांगतात की, तिला तिच्या पतीचे रहस्य कळले आहे. तिच्या पतीची हत्या झाली आहे आणि याला आत्महत्या म्हटले जात आहे. तिच्या आसपास शत्रू फिरत आहेत. तिच्या शरीरातही काही समस्या झाली आहे. तिच्यावर दबाव निर्माण केला जात आहे. जोपर्यंत गुपित उघड होत नाही आणि सीआयडी तपास होत नाही, तोपर्यंत केस धुणार नसल्याचा पवित्रा तुम्ही घेतला आहे, अशी माहिती धीरेंद्र शास्त्री देतात.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री महिलेला सांगतात…| Dhirendra Krishna Shastri
हे ऐकून ती महिला ढसाढसा रडायला लागते आणि 4 वर्षांपासून तिने केस धुतले नसल्याची कबुलीही देते. यावेळी ती बांधलेले केस उघडून सर्वांसमोर दाखवतेही. त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महिलेला सांगतात की, या प्रकरणाची CID चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल. यानंतर ते महिलेला म्हणतात की, सध्या तुमचे केस धुवू नका, जर हनुमानजींची इच्छा असेल तर तुमचे केस लवकरच धुण्याची वेळ येईल. यानंतर ती महिलेला निघून जाते.