सोलापूर,दि.6: विरोधकांना एकच भिती धर्मराज काडादी यांना लिड किती? अशी चर्चा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याचे संचालक धर्मराज काडादी यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. राजकारणापासून दूर असणाऱ्या काडादी यांनी श्री सिध्देश्वर परिवार आणि काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे असे मतदारांना वाटत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी (दि.4) माजी आमदार दिलीप माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. दिलीप माने यांनी धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. माने यांच्या पाठिंब्यामुळे काडादी यांच्या मताधिक्यात वाढ होणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आणि गुरूसिध्द म्हेत्रे यांनी पहिल्या पासूनच काडादी यांना पाठिंबा दर्शवला आहे.
बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आणि गुरूसिध्द म्हेत्रे यांच्यामुळे काडादी यांना निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. बाळासाहेब शेळके यांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहे. अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनाही मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. शिवाय श्री सिध्देश्वर सहकारी कारखान्याच्या सभासदांची मोठी संख्या या मतदारसंघात आहे.
यामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धर्मराज काडादी हे मताधिक्याने विजयी होतील यावर अनेकजण पैज लावत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकच भिती धर्मराज काडादी यांना लिड किती? अशी चर्चा सुरू झाली आहे. या मतदारसंघात लिंगायत आणि धनगर समाजाची संख्या मोठी आहे.