मुंबई,दि.४: मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संतोष देशमुख यांची निर्दयपणी हत्या करण्यात आली होती. त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर जनआक्रोश वाढला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. कराड हाच देशमुख हत्याप्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते.