सोलापूर,दि.27: भारतीय जनता पार्टीला माढ्यात मोठा धक्का बसला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध असूनही भाजपाने माढ्यातून त्यांना उमेदवारी दिली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र भाजपाने मोहिते पाटील यांना डावलून निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
जयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. आता धैर्यशील मोहिते पाटील ‘तुतारी’ चिन्हावर माढ्यातून निवडणूक लढणार आहेत.
मुंबई येथे विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांच्यासह धैर्यशील मोहिते पाटील खासदार शरद पवार यांची भेट घेणार असून उद्याच पक्ष प्रवेश कऱणार असल्याचे बोलले जात आहे. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपातच राहणार आहेत.