Devmanus 2: अजितकुमार देवने केलेल्या खुनाचं सत्य होणार उघड? डिंपलवर होणार जीवघेणा हल्ला

0

दि.7: Devmanus Season 2: झी मराठी (Zee Marathi) वरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) मधील डॉ. अजित कुमार देव हा अनेकांची हत्त्या करतो असे या मालिकेत दाखवण्यात आले होते. देवमाणूस मालिकेचा दुसरा सिजन (देवमाणूस 2) (Devmanus Season 2) सुरू झाला आहे. डॉ. अजितकुमार देव पत्नी सलोनी सोबत गावात परत येतो. त्यानंतर अजितकुमार देव तिचाही खून करतो.

अजितकुमार, सलोनीचा खून करतो. इतकंच नाही तर तिचा खून केल्यावर अजितकुमार तिचा मृतदेह नदीच्या पात्रात सोडतो. परंतु, अजितकुमारने सलोनीसोबत काही तरी बरं वाईट केलंय याचा अंदाज डिंपलला येतो आणि ती त्या दिशेने शोध घेते. नव्या भागात जुन्या कलाकारांसह काही नवे कलाकारही दिसून येत आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

नव्याने सुरु झालेल्या या भागात डॉ. अजितकुमार देव यावेळी गावकऱ्यांसमोर नटवर म्हणून आला आहे. परंतु, हा देवीसिंगच असल्याची खात्री डिंपलला पटली आहे. विशेष म्हणजे हेच आता तिच्या जीवावर बेतणार आहे.

अजितकुमार देवने पत्नीचा खून केल्याचा संशय डिंपलला आला आहे. विशेष म्हणजे सलोनीचा खून नटवरने म्हणजेच देवीसिंगने (अजितकुमार देव) केल्याची कुणकुण डिंपलला लागली आहे. त्यामुळे ती त्या दिशेने शोध घेत आहे. 

दरम्यान, डिंपल एकीकडे देवीसिंगविरोधात पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे देवीसिंग मात्र तिच्या हाताला कोणताही पुरावा लागणार नाही याची काळजी घेत आहे. इतंकच नाही तर आपलं बिंग फुटेल या भीतीने आता देवीसिंग डिंपलचा काटा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आता तो तिच्यावर जीवघेणा हल्ला करणार आहे. तेव्हा डिंपल या सगळ्यातून सुखरूप वाचेल कि डिंपलचा प्रवास संपेल? हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील भागात कळेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here