देवेंद्र कोठे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केला भाजपात प्रवेश

0

सोलापूर,दि.24: राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. देवेंद्र कोठे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

या प्रवेशातून भाजपने शहर उत्तर आणि शहर मध्य मतदारसंघात नवी राजकीय समीकरणे जुळवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. देवेंद्र कोठे हे दोन वेळा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याने कायमची चर्चा होत राहते ते थेट नागरिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे महेश कोठे यांना हा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत आहेत. देवेंद्र कोठे आता भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय होणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here