बेळगाव,दि.२५: Devendra Fadnavis On CM Candidate: देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ कोण असेल मुख्यमंत्री हे सांगितले आहे. राज्याच्या राजकारणात सध्या भावी मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार समोर येत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अलीकडेच एका मुलाखतीत मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं विधान केले. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स झळकावले. त्यानंतर नागपूरात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) भावी मुख्यमंत्री होणार असे पोस्टर्स लागले. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
२०२४ ला शिंदेच मुख्यमंत्री असतील | Devendra Fadnavis On CM Candidate
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले असतील ते ज्याने लावलेत त्याने काढून टाकावे. असा मूर्खपणा भाजपाच्या कुणी करू नये. कुणी अतिउत्साही लोकांनी लावला असेल. बातमीसाठी लोक असे प्रकार करतात. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. २०२४ ला शिंदेच मुख्यमंत्री असतील. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढू आणि जिंकून दाखवू असं त्यांनी सांगितले.
बारसू येथे विरोध करणाऱ्यांची संख्या कमी आहे. संख्या कमी असली तरी त्यांचा आम्ही सन्मान करतो, स्थानिक भूमिपूत्रांची भूमिका समजून घेऊ. राजकीय विरोध आम्ही सहन करणार नाही. रिलायन्स रिफायनरी गुजरातमध्ये आहे. तिथे कुठेही नैसर्गित नुकसान झाले नाही. महाराष्ट्रात रिफायनरी उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार येईल. मुंबईतून येऊन काही लोक विरोध करतात. हा विरोध बंद झाला पाहिजे. या महाराष्ट्राचा अतोनात नुकसान विरोध करणाऱ्यांमुळे होतोय. कोणाची सुपारी घेऊन तुम्ही विरोध करताय? महाराष्ट्रात हा प्रकल्प झाला नाही तर इतर राज्यात जाईल. सरकारच्या ३ कंपन्या मिळून एकत्रित हा प्रकल्प उभारतायेत. १००-२०० लोक होते. त्यांना ताब्यात घेते. कुठल्याही गोष्टीला विरोध करायचा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.