Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?

0

मुंबई दि.21: महाराष्ट्रात (Maharashtra) मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्रीपासून शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे संपर्काबाहेर गेले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 12 आमदार असल्याची माहिती समोर आली होती. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहिती आहे. सूरतमधील हॉटेलमध्ये 25 आमदार असल्याची माहिती आहे.

देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाल्याने राज्यात येत्या काही तासात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीत झटका बसल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात देवेंद्र फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेण्याची दाट शक्यता आहे.

नॉट रिचेबल आमदार :

साताऱ्याचे आमदार महेश शिंदे
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील
उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले
पंराड्याचे आमदार तानाजी सावंत
बुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकर
मेहकरचे आमदार संजय गायकवाड
बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहे
सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार
पैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरे
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट
कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत
वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे
भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर
महाडचे भरत गोगावले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here