देवा शरीफची जगप्रसिद्ध होळी; हिंदू आणि मुस्लिम मिळून उधळतात दर्ग्यात गुलाल

0

बाराबंकी,दि.25: उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील सूफी संत हाजी वारिस अली शाह यांच्या दर्ग्याची होळी जगभरात प्रसिद्ध आहे. रंगांना धर्म नसून रंगांचे सौंदर्य सर्वांना आकर्षित करते याचे हे जीवंत उदाहरण आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व धर्माच्या लोकांनी गुलाल आणि गुलाबाची होळी केली. लोकांनी एकमेकांना रंग आणि फुलांची उधळण करून होळी खेळून परस्पर बंधुभावाचा अनोखा नमुना सादर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बाराबंकीच्या देवा येथील सुफी संत हाजी वारिस अली शाह यांची समाधी त्यांचे हिंदू मित्र राजा पंचम सिंह यांनी बांधली होती. सुफी संत हाजी वारिस अली शाह यांनीही राम हा एकमेव देव असल्याचा संदेश दिला. कदाचित त्यामुळेच केवळ होळीच नाही तर समाधी बांधल्यापासून हे ठिकाण हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देत आहे. या समाधीवर मुस्लिम समाजापेक्षा हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने येतात. 

या दर्ग्यात होळी खेळण्याची परंपरा हाजी वारिस अली शाह यांच्या काळात सुरू झाली, ती आजही सुरू आहे. त्यावेळी होळीच्या दिवशी हाजी वारिस अली शाह बाबा यांचे चाहते गुलाल आणि गुलाबाची फुले आणून त्यांच्या चरणी ठेवून होळी खेळत असत. तेव्हापासून, होळीच्या दिवशी, लोक इथल्या क्वामी एकता गेटपासून मिरवणूक काढतात, नाचतात, गातात आणि वाद्य वाजवतात. दरवर्षी प्रमाणे ही मिरवणूक देवा नगरातून मार्गक्रमण करत दर्ग्यावर पोहोचली. या मिरवणुकीत प्रत्येक धर्माचे लोक सहभागी झाले होते.

यावेळी देवा शरीफ येथे आलेल्या लोकांनी सांगितले की, येथे होळी खेळण्याची परंपरा शेकडो वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळापासून चालत आलेली आहे. येथे गुलालाची उधळण करून होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व धर्माचे लोक येथे येतात आणि एकमेकांना रंग आणि गुलाल उधळून बंधुभावाचा आदर्श घालून देतात. त्याचबरोबर देवाच्या वारसी होळी समितीचे अध्यक्ष शेहजादे आलम वारसी म्हणाले की, समाधीस्थळी होळी फार पूर्वीपासून होत आहे, त्यात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. येथे अनेक क्विंटल गुलाल आणि गुलाबाची होळी खेळली जाते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here