सोलापूर जिल्ह्यात या योजनेंतर्गत पात्र कुटुंबाना मिळणार वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर

0

सोलापूर,दि.13: महाराष्ट्र राज्य शासनाने दि. 30 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंमलात आणली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांनी त्यांच्याकडे नोंद असलेल्या परंतु ई केवायसी न झालेल्या महिलांचे ई केवायसी त्वरित करून घ्यावे, असे निर्देश उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत श्रीमती कुंभार बोलत होत्या. यावेळी जिल्ह्यातील HPCL BPCL IOCL यांच्या सेल्स ऑफिसर व जिल्हा महिला बालविकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे उपस्थित होते.

या योजनेंतर्गत पात्रा लाभार्थ्यांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर रिफिल मोफत मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आगोदर स्वखर्चाने गॅस सिलेंडर रिफील करावे व त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात शासनाचे गॅस कंपनीकडून अनुदान वर्ग करण्यात येणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील खालील  लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री उज्वला योजना लाभार्थी संख्या 1 लाख 69 हजार 34, गॅस सिलेंडर रिफील किंमत 830, (अनुदानाचे स्वरूप 300 रूपये केंद्र सरकार व 530 राज्य सरकार). मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये 5 लाख 86 हजार 509 लाभार्थी पात्र ठरले आहेत. सदर पात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणी करून महिलांचे नावे गॅस कनेक्शन असणाऱ्या लाभार्थ्यांना ही मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ घेणेकामी संबंधित लाभार्थी यांनी आपली ई-केवायसी पूर्ण करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेची ई-केवायसी बाबत माहिती प्रधानमंत्री उज्वला योजना-1 लाख 69 हजार 034 लाभार्थी संख्या आहे तर  ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण झालेले लाभार्थी-68 हजार 396 इतके आहेत, पुर्ण ई-केवायसी टक्केवारी- 40.46%, ई-केवायसी प्रक्रिया शिल्लक असलेले लाभार्थी 1,00,638, शिल्लक ई-केवायसी टक्केवारी 59.54%.

सोलापूर जिल्ह्यात HPCL कंपनीचे 16 गॅस एजन्सी, IOCL कंपनीचे 20 गॅस एजन्सी, BPCL कंपनीचे 53 गॅस एजन्सी असे एकूण 89 गॅस एजन्सी कार्यरत आहेत. आजच्या आढावा बैठकीत HPCL कंपनीचे सेल्स ऑफीसर सागर चव्हाण, BPCL कंपनीचे सेल्स ऑफीसर रघु कुमार उपस्थित होते.

या बैठकीत शिल्लक असलेले ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पुर्ण करून घेणेबाबत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर यांनी सूचित केले आहे. तसेच ई-केवायसी प्रक्रिया शिल्लक असलेले लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीत जाऊन माहे ऑगस्ट – 2024 अखेर ई-केवायसी पुर्ण करून घ्यावी अन्यथा लाभार्थ्यांना लाभ देणेस अडचण उदभवु शकते. 

 ई-केवायसी प्रक्रिया लाभार्थ्यांना आपल्या गॅस एजन्सी मार्फत करता येणार असून ते पुर्णपणे मोफत करण्यता येणार आहे. तरी याबाबत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here