उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट

0

मुंबई,दि.2: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. गणेशोत्सवातील (Ganesh Utsav) गाठीभेटींमुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरु असताना ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, आशिष कुलकर्णी यांच्या घरी उभ्या-उभ्या भेट झाली असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले की, आशिष कुलकर्णींच्या घरी दर्शनासाठी गेले होतो, तेव्हा फडणवीस यांच्याशी उभ्या-उभ्या भेट झाली. आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. कुठलीही चर्चा किंवा बैठक झाली नाही. परवा काँग्रेसचा दिल्लीत मोर्चा आहे, त्यासाठी मी उद्या दिल्लीला जाणार आहे, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

भाजप आणि शिंदे गटामध्ये समन्वयासाठी नियुक्त केलेले भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांच्या घरी काल अशोक चव्हाण आणि फडणवीस गणपतीच्या दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. ही भेट गणपतीदर्शनामुळे घडलेला योगायोग होता की कुलकर्णी यांनी समन्वयानं भेट घडवून आणली अशी चर्चा देखील रंगली होती.

काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे नाराज असल्याच्या या आधी देखील चर्चा होत्या. मात्र अशोक चव्हाण यांनी यावर स्पष्टीकरण देत मी नाराज नाही, काँग्रेस पक्ष सोडण्याच्या चर्चा केवळ वावड्या असल्याचं त्यांनी या आधी देखील म्हटलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here