मुंबई,दि.२: Ajit Pawar: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona) रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. “कोरोनाच्या केसेस सध्या वाढायला लागल्या आहेत. रुग्ण वाढणे हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल.”, असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. आज (गुरुवार) जनता दरबार उपक्रमास उपस्थित राहिले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तसेच, “कोरोनाच्या तिन्ही लाटेत राज्यातील जनतेने कोरोनाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे सध्या वाढत असलेल्या संख्येवर राज्यसरकार व सर्व यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.” असेही अजित पवार म्हणाले.
अजित पवार (Ajit Pawar) पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्हाला डॉक्टर व्यास सर्व माहिती देतात. जगात काय चाललेय, देशात काय चाललेय, राज्यांमध्ये काय चाललेय, राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललेय हे आम्हाला सांगत असतात. या सर्व माहितीमधून सध्या एक पाहायला मिळातेय की, कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या वाढतेय. मात्र व्हेटिंलेटर, ऑक्सिजन बेडवर फार कमी लोक आहेत, असे अजित पवार म्हणाले.
आम्हाला प्रश्न कोण विचारणार?
डॉक्टरांचा सल्ला घेऊन बुस्टर डोस घेतला पाहिजे. अनेकांनी दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी तो घेतला पाहिजे. दोन्ही डोस घेणाऱ्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने तिसरा डोस घेतला पाहिजे, असे सांगत मास्क आमची त्यावर नजर आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की मास्क वापरणे बंधनकारक केले पाहिजे तेव्हा आम्ही लगेच मास्क बंधनकारक करु, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. तसेच मास्क बंधनकारक करण्याचा विचार करावाच लागेल. तुम्हाला कोरोना झाला तर आम्हाला कोण प्रश्न विचारणार, असा टोला अजित पवारांनी लगावला.
Home महाराष्ट्र Ajit Pawar: वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला सूचक इशारा