Delhi MCD Results 2022: MCD मध्ये चालला ‘झाडू’, भाजपाची 15 वर्षांची सत्ता हिसकावून ‘आप’ला बहुमत

MCD Election Results: दिल्ली महानगरपालिकेचे (MCD) 250 प्रभाग असून या निवडणुकीत 1,349 उमेदवार रिंगणात आहेत.

0

नवी दिल्ली,दि.7: MCD मध्ये ‘झाडू’ चालला आहे. भाजपाची 15 वर्षांची सत्ता हिसकावून ‘आप’ला बहुमत मिळाले आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) कमाल केली आहे. दिल्ली महापालिका निवडणुकीत (Delhi MCD Election Results 2022) आम आदमी पक्षाला बहुमत मिळालं आहे.

Delhi MCD Results 2022

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत (MCD Election) आम आदमी पक्षाने (AAP) बहुमताचा आकडा पार केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपची सत्ता होती, ती आम आदमी पक्षाने हिसकावून घेतली आहे.

Delhi MCD Election Results 2022

आम आदमी पक्षाने (आप) आतापर्यंत 132 जागा जिंकल्या आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून, त्यांनी आतापर्यंत 97 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे, काँग्रेसबद्दल बोलायचे झाले तर काँग्रेसला केवळ 6 जागा जिंकता आल्या आहेत. तीन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

Delhi MCD Results 2022

दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती

दिल्ली महापालिकेच्या 250 जागांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (7 डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत 250 जागांसाठी एकूण 1349 उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.

मंत्री सत्येंद्र जैन मतदारसंघात भाजपा उमेदवार विजयी

अबुल फजलमधून काँग्रेसच्या उमेदवार अरिबा खान विजयी झाल्या आहेत. त्यांचे वडील आसिफ खान निवडणुकीदरम्यान पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. झाकीर नगरची जागाही काँग्रेसने काबीज केली आहे. दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या शकूरबस्ती मतदारसंघातील सरस्वती विहार, पश्चिम विहार आणि राणीबाग या तीनही जागा भाजपने जिंकल्या आहेत.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले, “दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवल्याबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. दिल्लीच्या जनतेने जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात नकारात्मक पक्षाचा पराभव करून प्रामाणिकपणा दाखवला आहे. काम करणारे अरविंद केजरीवाल यांना विजयी केले आहे. आमच्यासाठी हा केवळ विजय नाही, तर मोठी जबाबदारी आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here