नवी दिल्ली,दि.८: दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू झाली. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पक्षाचे अनेक नेते मागे पडताना दिसत आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष सातत्याने सत्तेत परतणार की २७ वर्षांनी भाजप राजधानीत सरकार स्थापन करणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकू न शकलेल्या काँग्रेसला या निवडणुकीकडून मोठ्या आशा आहेत. मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
राजधानीत ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. राजधानीतील १९ मतमोजणी केंद्रांसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यामध्ये प्रत्येक केंद्रावर निमलष्करी दलाच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. निकालांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये असे सांगण्यात आले होते की यावेळी दिल्ली भाजपसाठी फार दूर नाही. म्हणजेच, एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असे म्हटले होते. जर असे झाले तर तो स्वतःच एक नवीन इतिहास असेल.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे चौथ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार असा विश्वास दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांनी मनमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी व्यक्त केला.
भाजप 35, आप 34 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. रिठाला येथून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन पुढे. ओखला येथून भाजपचे मनीष चौधरी यांनी आघाडी घेतली.
सुरुवातीच्या दोन तासांनंतर पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे, भाजपला मागे टाकले. ग्रेटर कैलाशमधून आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आघाडी घेतली. शकूर बस्ती येथून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन आघाडीवर. राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर आहेत