Deepak Kesarkar On MLA Disqualification: आमदार अपात्र प्रकरण मंत्री दीपक केसरकर यांचे मोठे वक्तव्य

0

मुंबई,दि.१३: Deepak Kesarkar On MLA Disqualification: आमदार अपात्र प्रकरण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आमदारांना अपात्रतेच्या नोटिसा पाठविल्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गट रडीचा डाव खेळण्यात माहिर असल्याचे म्हटले आहे. सत्याचा नेहमी विजय होतो, असे म्हणत प्रत्येक मोठ्या माणसाने आपला इगोला वेसन घातली पाहिजे, असा सल्लाही दिला आहे. तसेच अध्यक्षांच्या पातळीवर हा विषय संपणार नाही, हा विषय कोर्टात जाईल, असे सुतोवाचही त्यांनी केले आहे. 

काय म्हणाले दीपक केसरकर? | Deepak Kesarkar On MLA Disqualification

प्रत्येक घरात थोडीशी धुसपुस असते. विशेषतः नवा घरोबा झाला की अशी धुसपुस असते. हसन मुश्रीफ यांच्याशी बोलणार आहे ही धुसपुस लवकरचसंपेल, असेही केसरकर म्हणाले. बोलून मोकळं व्हायचं म्हणजे.. आपण निर्णय घ्यायचा असा अर्थ आहे. ठाकरे सरकार आरक्षणाची बाजू कोर्टात मांडू शकलेले नाही त्यामुळे आरक्षण टिकले नाही, हा त्यांचा पराभव आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचा प्राण वाचविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत आहेत, असे स्पष्टीकरण केसरकर यांनी दिले. 

केंद्र एका राज्याच्या बाबतीत निर्णय घेवू शकत नाही. ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळेल, असेही केसरकर यांनी मराठा आरक्षणावर शाहूमहाराजांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिले. 

बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो. नाहीतर त्याच वेळी मी भाजपमध्ये गेले असतो तर केंद्रात कॅबिनेट मंत्री झालो असतो. कोकणची जबाबदारी माझ्यावर आली असती. वापरा आणि सोडून द्या हे बाळासाहेबांनी कधी केले नाही. मोदी देशातील नेत्यांना  महात्मा गांधींच्या समाधी स्थळी नेऊ शकतात. मग उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना बाळासाहेबांच्या समाधीस्थळी का नेलं नाही, असा सवालही केसरकर यांनी केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here