लाईव्ह सामन्यात डेव्हिड वॉर्नर राशिद खानवर भडकला

0

मुंबई,दि.८: लाईव्ह सामन्यात डेव्हिड वॉर्नर राशिद खानवर भडकला याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लाईव्ह सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि राशिद खान यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आयसीसी वनडे विश्वचषक २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानच्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २९२ धावांचे लक्ष्य ठेवले, त्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खराब झाली. या सामन्यात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि राशिद खान यांच्यात बाचाबाची झाली, तर मिचेल मार्शही ओमरझाईशी वाद घालताना दिसला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या फलंदाजीदरम्यान, चौथ्या षटकात राशिद खान डेव्हिड वॉर्नरकडे येताना दिसला आणि षटकानंतर काहीतरी बोलत होता, त्यानंतर वॉर्नर रागावलेला दिसला. वॉर्नर रशीद खानला सतत काही ना काही बोलताना दिसला. मात्र, यावेळी राशिद खान पूर्णपणे शांत दिसत होता. गोलंदाज अजमतुल्ला ओमरझाई आणि मिचेल मार्श यांच्यात वाद झाला तेव्हा हे सर्व सुरू झाले.

यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श एकमेकांशी बोलत असताना राशिद खान काहीतरी बोलला. वैयक्तिक संभाषणात ढवळाढवळ करताना वॉर्नर रशीदवर चांगलाच चिडला आणि त्याला खूप काही बोलताना दिसला. राशिद खानने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो शांत होण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत होते. वॉर्नरला ओमरझाईने १९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मिचेल मार्श आणि अफगाणिस्तानचा गोलंदाज ओमरझाई यांच्यात जोरदार वादावादी झाली. चेंडू फेकल्यानंतर उमरझाईने फलंदाज मिचेल मार्शला स्लेज केले, त्यानंतर मिचेल मार्श उमरझाईला काहीतरी बोलताना दिसला. आऊट झाल्यानंतरही मिचेल मार्श उमरझाईकडे बॅट दाखवताना दिसला.

अलीकडे, ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिल्याने या दोन संघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खान आणि नवीन उल हक या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती. त्याच्या बाजूने, ऑस्ट्रेलियाने कारण दिले की अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने महिलांना क्रिकेट खेळण्यास बंदी घातली आहे, म्हणूनच ऑस्ट्रेलियाने द्विपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here