Dattatray Ware: मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आरोपमुक्त मुख्याध्यापक दत्तात्रय वारेंचे पाय धुतले

0
प्रकाश महाजन यांनी धुतले दत्तात्रय वारे गुरूजींचे पाय

पुणे,दि.27: Dattatray Ware: मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आरोपमुक्त दत्तात्रय वारे गुरूजींचे पाय धुतले आहेत. एका खेड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची किमया करणारे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी अखेर एका प्रकरणातून दोषमुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या दत्तात्रय वारे गुरुजींना आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा बनवल्याप्रकरणी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Dattatray Ware: प्रकाश महाजन यांनी आरोपमुक्त दत्तात्रय वारे गुरूजींचे धुतले पाय

पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या (Pune News) शाळेचा (Wabalewadi School) प्रकरणात जोपर्यंत मी निर्दोष असल्याच सिद्ध होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असा निर्णय दत्तात्रय वारे (Dattatray Ware) गुरुजी यांनी घेतला होता. दोन दिवासांपूर्वी जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने वारे गुरुजींना निर्दोष ठरवलं. त्यानंतर आज मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी वाबळेवाडीतील शाळेत जाऊन वारे गुरुजींचे पाय धुतले आणि पुन्हा चप्पल घालण्याची विनंती केली. यावेळी वारे गुरुजी भावुक झाल्याचं बघायला मिळालं.

पुणे जिल्ह्यातील (Pune District) वाबळेवाडीच्या शाळेचा कायापालट करणाऱ्या दत्तात्रय वारे गुरुजींची नुकतीच त्यांच्यावरील आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली. गावच्या राजकारणातून वारे गुरुजींवर वाबळेवाडीच्या शाळेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. यामुळे वारे गुरुजींनी पायात चप्पल घालणं बंद केलं होतं. जोपर्यंत मी निर्दोष असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही, असा निर्धार वारे गुरुजींनी केला होता. आता जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने वारे गुरुजींना निर्दोष ठरवल्यावर वारे गुरुजींनी चप्पल घालावी यासाठी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी वारे गुरुजींचे वाबळेवाडीतील शाळेत जाऊन पाय धुतले आणि पुन्हा चप्पल घालण्याची विनंती केली.

काय होता आरोप?

शाळेच्या विकासासाठी गावकऱ्यांचा समावेश असलेली शाळा विकास समिती वाबळेवाडीत काम करत होती. शाळेसाठी ही समिती ऐच्छिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या देणग्या स्वीकारत होती. देणग्या स्वीकारताना त्याचा व्यवस्थित हिशोब ठेवला नसल्याचं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दत्तात्रय वारे यांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता.

स्थानिक राजकारणामुळे दत्तात्रय वारे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. दत्तात्रय वारे सकाळपासून रात्रीपर्यंत शाळेत थांबत होते. पण कामात अनियमितता असा आरोप ठेवून त्यांचं निलंबित केल्याचं नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं. गावकऱ्यांनी लाखो रुपये जमा केले, काही कंपन्यांकडून निधी मिळवला, त्याचा हिशोब गावकऱ्यांनी ठेवला. मुख्याध्यापकांचा काहीच संबंध नाही. परंतु, ओढून-ताणून त्यांना या आर्थिक व्यवहारात जबाबदार धरुन निलंबित केल्याचं काही स्थानिकांनी म्हटलं होतं.

दत्तात्रय वारे गुरूजींचे कार्य

शिरूर तालुक्यातील शिक्रापूरपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर वाबळेवाडी गाव आहे. या गावात 50 ते 60 घरे आहेत. या गावातील लोकसंख्या 400 च्या आसपास आहे. या गावातील जालिंदर नगरमध्ये दोन खोल्यांची शाळा होती. या शाळेच्या भिंती पडक्या झाल्या होत्या. खोल्याही गळक्या होत्या. तशाच परिस्थितीत विद्यार्थी या शाळेत शिकत होते. शाळेत 8 ते 10 विद्यार्थी शिकत होते.

या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर दत्तात्रय वारे गुरुजी यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेतलं. त्यांना शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि शाळेचा कायापालट केला. वारे गुरुजींनी ही शाळा काचेची बनवली. शालेय अभ्यासक्रमाशिवाय शाळेत 16 वेगवेगळे विषय शिकवले जाऊ लागले. जपानी भाषेसह इतर भाषाही शिकविल्या जाऊ लागल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here