DA Hike Update News: खुशखबर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होऊ शकते वाढ

0

दि.18: DA Hike Update News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) मोठी वाढ होऊ शकते. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्के केला जाण्याची शक्यता आहे. 1 जुलै 2022 पासून या वर्षाच्या महागाई भत्त्याच्या दुसऱ्या टप्प्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली जाईल असा अंदाज या आधी वर्तवण्यात येत होता. आता औद्योगिक कामगारांसाठीच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अलीकडील आकडेवारीनंतर, महागाई भत्ता 4 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत वाढवला जाण्याची शक्यता आहे. (DA Hike Update News)

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळतो. हा महागाई भत्ता 38 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा होती. मात्र महागाई भत्त्यात 5 टक्क्यांनी वाढ होणार असल्याचं मानलं जात आहे. एप्रिल महिन्यातील अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार हा अंदाज वर्तवला जात आहे.

देशातील वाढती महागाई पाहता, जुलै महिन्यात केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार 8 हजार रुपयांवरून 27 हजार रुपयांपर्यंत वाढू शकतो.

केंद्र सरकारकडून किरकोळ महागाईच्या आकडेवारीच्या आधारे जानेवारी आणि जुलै महिन्यात वर्षातून दोनदा DA आणि DR मध्ये सुधारणा करण्यात येते. देशातील महागाई RBI च्या अंदाजाच्या पुढे गेली आहे. देशातील किरकोळ महागाई RBI च्या सहनशीलतेच्या 6 टक्क्यांच्या वर गेली आहे. किरकोळ महागाईचा दर मार्चमध्ये 6.95 टक्क्यांवरून एप्रिलमध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचला आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांवर होणार आहे. महागाईबरोबरच ईएमआयही महाग होत आहे, अशा परिस्थितीत महागाई भत्त्यात वाढ केल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून महागाई भत्ता वाढवण्याची पद्धत ट्रेंड आहे. त्यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आतुरतेने याची वाट पाहत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here