मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच आर्थिक फसवणूक

0

मुंबई,दि.15: मोबाईल कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. नामांकित मोबाईल कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने केवायसी न करता सिम कार्ड पोर्ट करून आर्थिक फसवणूक करणाऱ्यासाठी त्याचा वापर करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या सायबर विभागाने आरोपींना अटक केली आहे. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संगनमताने अनेकांची फसवणूक केली आहे. 

मोबाईल कंपनीचे सिमकार्ड कर्मचारीच सायबर गुन्हेगारांनीशी हातमिळवणी करत बेकायदेशीररीत्या सिमकार्ड क्रमांक पोर्ट करून तो सायबर ठगांना पुरवत असल्याचे सायबर (मध्य) पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांसह आठ जणांना मुंबई, ठाण्यातून अटक केली आहे. या ठगांनी गेल्या वर्षभरात 30 हजार सिम कार्ड परदेशी नागरिक तसेच इतरांना कोणतीही केवायसी कागदपत्रे न स्वीकारता बेकायदेशीररीत्या विकल्याचे समोर आले आहे. 

बेकायदेशीररीत्या सिमकार्ड क्रमांक पोर्ट करून मोबाईल कंपनीचे कर्मचारीच सायबर गुन्हेगारांनीशी हातमिळवणी करत तो सायबर ठगांना पुरवत असल्याचे सायबर पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने हे सायबर गुन्हेगार फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्यानंतर तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

यांच्यावर कारवाई 

एअरटेल डीएसई कर्मचारी गुलाबचंद जैस्वार (कांदिवली), महेश कदम (दिवा), रोहित यादव (भांडुप), सागर ठाकूर (वडाळा), राज आर्डे (कल्याण), दुकान मालक  उस्मान अली शेख (कुलाबा), अबुबकर सिद्दिकी युसुफ (कुलाबा) आणि व्हीआय कंपनीचा कर्मचारी महेश पवार (घाटकोपर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मे ते 28 जून दरम्यान आरोपींनी तक्रारदार यांना दोन व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड. केले. पुढे, शेअर ट्रेडिंगमध्ये  पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या व्हर्च्युअल पेजवर खाते तयार करून बनावट नफा जमा होत असल्याचे दाखवले. 

विविध बँक खात्यांमध्ये एकूण 51 लाख 36 हजार जमा करण्यास भाग पाडले. सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्याने कोणतीही केवायसी कागदपत्रे न घेता फक्त यूपीसी कोडद्वारे मोबाइल क्रमांक पोर्ट करून ते सायबर भामट्यांना आर्थिक फसवणुकीसाठी पुरवल्याचे समोर आले. यामध्ये भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक  झाल्याचे समोर आले आहे.  

यातील पीडितांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कदम, ठाकूर, आर्डे आणि जैस्वार हे हॅन्डलूम एम्पोरियम वोडाफोन आयडिया मुंबईचे डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह (डीएसई) आहेत. 

त्यांनी एअरटेल डीएसई कर्मचारी गुलाबचंद कन्हैया जैस्वार याच्या मदतीने बेकायदेशीररीत्या एअरटेलमधून व्होडाफोन आयडियामध्ये फक्त युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोडचा वापर (यूपीसी) करून विविध राज्यांतून मुंबई येथे मोबाइल क्रमांक पोर्ट केले आहेत.  


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here