crocodile viral video: मगरीच्या जबड्यात व्यक्तीने घातले डोकं, व्हिडीओ व्हायरल

0

नवी दिल्ली,दि.30: crocodile viral video: सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. अनेकजण प्रसिध्दीसाठी जीव धोक्यात घालतात. प्राणी हे धोकादायक असतात. कारण ते कधी हल्ला करतील काही सांगू शकत नाही. मग ते पाळीव असो किंवा जंगली. त्यामुळे बरेच लोक प्राण्यांना घाबरतात. मगर हा भयानक शिकारी आणि धोकादायक प्राणी आहे हे सर्वांनाच माहितीय. लोक मगरीच्या जवळ जायलाही घाबरतात. तरीही असे काही लोक आहेत जे आपला जीव धोक्यात घालून प्राण्यांच्या जवळ जाऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. अशी स्टंटबाजी नेहमीच लोकांच्या जीवावर बेतली आहे. असाच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये एक व्यक्ती मगरीच्या जबड्यात आपलं डोकं घालतो मात्र पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत जे घडतं ते पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

वाघ, सिंह, हे भयानक शिकारी आहेत मात्र मगरही खूप धोकादायक आहे. तिच्या तावडीत सापडल्यावर वाचणं अवघड आहे. जर मुद्दाम कोणी मगरीच्या जवळ जाऊन स्टंटबाजी करत असेल तर ते खूपच मुर्खपणाचं आहे. असाच मुर्खपणा एका व्यक्तीने केलाय. त्यानं चक्क मगरीच्या जबड्यात स्वतःहून डोकं नेलं आणि आपला जीव धोक्यात टाकला.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मगरीनं तिचा जबडा मोठा केला आहे. एक व्यक्ती तिच्या जबड्यात स्वतःहून डोकं ठेवतो. काही सेकंदांनंतर तो डोकं बाहेर काढू लागतो तर मगर त्याला पकडते. त्याचं डोकं पकडून मगर त्याला जोरात फिरवते. मगरीच्या तावडीतून व्यक्ती सुटतो. मात्र हे दृश्य पाहूनच अंगावर काटा येतो. सुदैवानं व्यक्तीचा जीव वाचला नाहीतर मगरीच्या जबड्यातून वाचणं अवघड आहे. कोणीही सहसा सहजी तिच्या जबड्यातून बाहेर येत नाही.

@1000waystod1e नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 20 सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओवर भरपूर कमेंटही येताना दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here