Covid Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर, देशात २ लाख ४७ हजार ४१७ रुग्णांची भर

0

Covid Third Wave: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत देशात पुन्हा एकदा रुग्ण संख्येत (Corona Cases In India) मोठी वाढ झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या २४ तासांतील आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही अडीच लाखाच्या जवळ गेली आहे. देशात २ लाख ४७ हजार ४१७ इतके नवीन रुग्ण गेल्या २४ तासांत आढळून आले आहेत. ही संख्या बुधवारच्या तुलनेत २७ टक्क्यांनी अधिक आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी (PM Modi) आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेत आहेत. दुपारी ४.३० वाजता ही बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. कोरोनाच्या स्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. ३० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी ही बैठक घेणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray) यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही (Dilip Walse-Patil) या बैठकीला उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्रात रोज ३० हजारांवर नवीन रुग्ण आढळून येत आहेत.

पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. १९ राज्यांमध्ये १० हजारहून अधिक ओमिक्रॉन कोरोना रुग्ण असून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी बुधवारी दिली होती.

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. आज, राज्यात कोरोनाच्या ४६,७२३ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ३२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईत १६ हजार ४२०, तर पुणे मनपा हद्दीत ४ हजार ९०३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here