Covid Restrictions: देशातील या राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

0

बंगळुरू,दि.19: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशातील महाराष्ट्र, व्हिडिओ कर्नाटकसह अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाढणाऱ्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, कर्नाटकात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देशातील अनेक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या कमी आढळत आहे. अनेक रुग्णांना तर रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (karnataka Chief Minister Basavaraj Bommai) यांनी कर्नाटकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता, राज्यात लागू केलेले निर्बंध, वीकेंड आणि रात्रीचा कर्फ्यू हटवण्यासाठी 21 जानेवारीला तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेतला जाईल, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकांना ताप आणि खोकला येत आहे. यासोबतच तिसऱ्या लाटेत लोक रुग्णालयात दाखल न होता घरीच बरे होत आहेत, असेही बसवराज बोम्मई यांनी सांगितले. लोक कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आपला दैनंदिन व्यवसाय करू शकतात. तज्ज्ञांच्या समितीला लोकांच्या भावना अवगत करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, लोकांच्या मागणीकडे लक्ष देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. समिती राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहे, असे बसवराज बोम्मई म्हणाले.

शुक्रवारी होणाऱ्या तज्ज्ञांच्या बैठकीत राज्याचे संपूर्ण चित्र समोर येईल, असे बसवराज बोम्मई म्हणाले. तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयांवरही भार नाही. आम्ही रुग्णालयांना ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे बसवराज बोम्मई यांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here