नवी दिल्ली,दि.24: कोरोनाच्या (Covid-19) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने (Central Government) महत्वाचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये कोरोनाने (Corona Outbreak) पुन्हा कहर केला आहे. चीनसह जगभरातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी करण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. (RT-PCR Mandatory for Arrivals in India)
तसेच चीन, जपान, कोरिया आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंगही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
हेही वाचा Amol Mitkari: अमोल मिटकरींचा आमदार निवासातील व्हिडिओ ट्विट करत आरोप
कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास… | Covid-19 India
चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड देशांतील कोणत्याही प्रवाशाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे. तसेच, चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंडमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्य स्थितीची माहिती देण्यासाठी कोविड-19 हवाई सुविधा फॉर्म भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.
भारतात कोरोनाचे 3397 सक्रिय रुग्ण | Covid-19 India News
भारतात आज 201 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 4 कोटी 46 लाखांच्या पार गेली आहे. देशात सध्या 3,397 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी नवीन आकडेवारी जारी केली आहे. तसेच देशात आतापर्यंत पाच लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
भारतात ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण
जगभरात सध्या कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. भारतातही ओमायक्रॉनच्या BF.7 व्हेरियंटचे चार रुग्ण आढल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. काही राज्यांनी मास्कसक्ती लागू केली आहे.