Corona Third Wave: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात: कोविड टास्क फोर्स प्रमुख

0

महानगरांमधील 75% प्रकरणे ओमिक्रॉनची: डॉ. एनके अरोरा

दि.4: Corona Third Wave In India: भारतात कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) आली असून महानगरांमधील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 75 टक्के प्रकरणे ओमिक्रॉनमधून (Omicron) येत आहेत. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख एनके अरोरा (Dr. NK Arora) यांनी ही माहिती दिली आहे. अरोरा म्हणाले की, कोविड-19 ची तिसरी लाट भारतात स्पष्टपणे आली आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख अरोरा यांनी असेही सांगितले की ही लस 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

भारतात ओमिक्रॉनचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यापैकी बहुतेक रुग्ण हे मोठ्या शहरांमधून येत आहेत. करोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचे हे संकेत आहेत. दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे ओमिक्रॉन (Omicron) च्या एकूण रुग्णांपैकी 75 टक्के रुग्ण आढळले आहेत, असे देशाच्या लस वॅक्सिन टास्क फोर्सच्या प्रमुखांनी सांगितले. देशात कोविड लसीकरण सुरू झाल्यापासून एन. के. अरोरा या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत.

हेही वाचा Vaccination: सोलापुरात 15 ते 18 या वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू

“ज्या वेरियंटची जिनोम सिक्वेन्सिंग केली गेली, त्यानुसार, गेल्या आठवड्यात राष्ट्रीय स्तरावरील सर्व वेरियंटपैकी 12 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचे आहेत. पण गेल्या आठवडाभरात हे प्रमाण 28 टक्क्यांवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत कोविड संसर्गाच्या इतर वेरियंटपेक्षा ओमिक्रॉनचे रुग्ण खूप वेगाने वाढत आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता येथे हे रुग्ण आढळून येत आहेत आहे. महानगरांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत आहे. या महानगरांमध्ये ओमिक्रॉन (Omicron) ची 75 टक्के रुग्ण आहेत, असे नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन, किंवा NTAGI चे प्रमुख डॉ. अरोरा म्हणाले.

भारतात Omicron च्या 1700 रुग्णांची अधिकृतपणे नोंद झाली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात सर्वाधिक 510 रुग्णांची नोंद झाली आहे. भारतात स्पष्टपणे करोनाची तिसरी लाट आली आहे आणि संपूर्ण परिस्थिती पाहता, नवीन वेरियंटचे अधिक रुग्ण आहेत. ते ओमिक्रॉनचे आहेत. गेल्या 4-5 दिवसांत सापडलेले पुरावे देखील याकडे निर्देश करतत आहेत आणि करोना रुग्णांमध्ये मोठी वाढत होत आहे, अरोरा म्हणाले.

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत उपस्थित करण्यात येत असलेल्या शंकाही आरोरा यांनी फेटाळून लावल्या. कोवॅक्सिन लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि किशोरवयीन मुलांना कालबाह्य होणारी कोविड लस दिली जात नाहीए, असे एन. के. आरोरा यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here