Corona News: देशातील या राज्यात लस न घेणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

0

1 फेब्रुवारीपासून घराबाहेर पडण्यास बंदी घालण्याची तयारी!

दि.1: Corona News: देशात कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases In India) वाढत आहे. जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण (Vaccination) लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जयपूरमध्येही कोरोनाचा कहर सुरूच आहे. कोरोना स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. जयपूरमध्ये केवळ एका दिवशी म्हणजे शनिवारी कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचे (Omicron) सुमारे 200 रुग्ण आढळून आले आहेत. हा आकडा गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक आहे.

राजस्थानमध्ये ओमिक्रॉनची 52 नवीन प्रकरणे

राजस्थानमध्ये आज ओमिक्रॉनचे (Omicron) एकूण 52 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापैकी जयपूरमधून 38, प्रतापगड, सिरोही, बिकानेरमधून 3-3, जोधपूरमधून 2 आणि अजमेर, सीकर आणि भिलवाडामधून 1-1 नवीन रुग्ण आढळले आहेत.

या सर्व ओमिक्रॉन पॉझिटिव्ह लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करताना, डेडिकेटेड ओमिकॉन वॉर्डमध्ये आयसोलेशन केले जात आहे. या 52 व्यक्तींपैकी 9 जण परदेशातून परतले आहेत, 4 व्यक्ती परदेशी प्रवाशांच्या संपर्कात आले आहेत आणि 12 जणांनी इतर राज्यातून प्रवास केला आहे. यापैकी दोघे पूर्वी सापडलेल्या ओमिक्रॉनच्या संपर्कात होते. शनिवारपर्यंत राजस्थानमध्ये 121 लोक ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी सापडलेल्या 69 ओमिक्रॉन संक्रमित लोकांपैकी 61 बरे झाले आहेत.

1 फेब्रुवारीपासून घराबाहेर पडण्यास बंदी घालण्याची तयारी!

मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे की, दोन्ही डोस जानेवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येला देण्यात यावेत. आणि जे लस घेणार नाहीत, त्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्याचा नियम करण्यात यावा. त्यांनी म्हटले आहे की 1 फेब्रुवारीपासून लस नसलेल्यांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात येईल.

3 जानेवारी रोजी कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांचा आढावा घेऊन शाळा-कॉलेज बंद ठेवण्याबाबतही निर्णय घेतला जाणार आहे. राजस्थान सरकारने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी घातली नव्हती. त्यामुळे जयपूरमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या झाल्या. एकट्या डिसेंबरमध्ये जयपूरमध्ये 6 लाख पर्यटक आले आहेत. राजस्थान सरकार उद्यापर्यंत देण्यात आलेली सवलत रद्द करू शकते, नवीन निर्बंध लागू करू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here