Congress | काँग्रेसने गुजरात निवडणूक निकालाआधीच घेतला महत्त्वाचा निर्णय

Congress News | घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

0

अहमदाबाद,दि.8: काँग्रेसने (Congress) गुजरात निवडणूक निकालाआधीच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक्झिट पोलनुसार (Exit Poll 2022) गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपची सत्ता येणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दोन टप्प्यांमध्ये झालेल्या गुजरात विधानसभेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळेल असं दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचं काय होणार? असा प्रश्न सर्वांनाच आहे. यादरम्यानच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मतमोजणी पूर्ण होण्याआधीच काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

Congress | घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने घेतला निर्णय

घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांना तात्काळ राजस्थानमध्ये हलवण्यात येणार आहे.

सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आधीच सावध पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विजयी आमदारांना आज रात्री 8 वाजेपर्यंत जयपूरला हॉटेलमध्ये हलवलं जाईल. याबद्दलची पुष्टी अशोक गेहलोत करतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेसचा प्लॅन बी तयार आहे. अपेक्षेपेक्षा जास्त निकाल लागल्यास आमदारांना आधी हिमाचलमधील एका वेगळ्या ठिकाणी आणि नंतर राजस्थानला नेले जाईल. भूपेश बघेल आणि भूपेंद्र हुडा हे निरीक्षक आहेत.

सातव्यांदा भाजपाची सत्ता येणार?

गुजरातमध्ये आतापर्यंत लागोपाठ 6 वेळा भाजपची सत्ता आली आहे. आता एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर लागोपाठ सातव्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलेल. 2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here