Congress: 23 उमेदवारांची काँग्रेसची दुसरी यादी जाहीर 

0

मुंबई,दि.26: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (दि.24) जाहीर करण्यात आली होती. आता काँग्रेसने (Congress) आज त्यांची दुसरी 23 जागांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत सोलापूर शहर मध्यचा उमेदवाराचे नाव नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून हळूहळू बैठकानंतर उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. 

मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. शिवसेनेने बुधवारी (दि.23) 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात बार्शीमधून माजी मंत्री दिलीप सोपल यांना तर सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा यासाठी अजूनही काँग्रेस नेते आग्रही आहेत. 

माजी आमदार दिलीप माने यांना…

अशातच आता काँग्रेसने दुसरी यादी जाहीर केली आहे. मात्र यात सोलापूर शहर मध्यचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. शहर मध्यची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसलाच मिळण्याची शक्यता आहे. येथून माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

राज्यातील काँग्रेस नेत्यांनी हायकमांडशी चर्चा केल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान, दुसऱ्या यादीनंतर आता महाविकास आघाडीमधील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे. मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे अद्यापही महाविकास आघाडीचा नेमका फॉर्म्युला काय हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे सध्या अत्यंत जपून पावलं टाकत आहेत. 

काँग्रेसची दुसरी यादी

भुसावळ – राजेश मानवतकर

जळगाव – स्वाती वाकेकर

अकोट – महेश गणगणे

वर्धा – शेखऱ शेंडे

सावनेर – अनुजा केदार

नागपूर दक्षिण – गिरिश पांडव

कामठी – सुरेश भोयर

भंडारा – पूजा ठवकर

अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड

आमगाव – राजकुमार पुरम

राळेगाव – वसंत पुरके

यवतमाळ – अनिल मांगुलकर

आर्णी – जितेंद्र मोघे

उमरखेड – साहेबराव कांबळे

जालना – कैलास गोरंट्याल

औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख

वसई : विजय पाटील

कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया

चारकोप – यशवंत सिंग

सायन कोळिवाडा : गणेश यादव

श्रीरामपूर : हेमंत ओगले

निलंगा : अभय कुमार साळुंखे

शिरोळ : गणपतराव पाटील


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here