काँग्रेस नेते मिलिंद देवरासह 10 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई,दि.14: काँग्रेस नेते माजी खासदार मिलिंद देवरासह काँग्रेसच्या 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीत दक्षिण मुंबई लोकसभा जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता कमी होती. देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघासाठी आग्रही होते. यावरून काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) पक्षात मतभेद वाढले होते.

लोकसभेची जागा काँग्रेसला सुटावी म्हणून ठाकरे गटाविरोधात वक्तव्य करणारे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. देवरासह 10 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दक्षिण मुंबई लोकसभेतून ठाकरे गटाचे अरविंद सावंत निवडणूक लढवणार आहेत. मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यामुळे दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी देवरा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत पाहायला मिळणार आहे.

मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. देवरा म्हणाले की, मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं. असा कार्यक्रम होत असताना कुणाला तरी नजर लावायची असते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here