Congress Profile Photo: काँग्रेस आणि नेत्यांनी बदलला सोशल मीडिया प्रोफाईल फोटो

0

मुंबई,दि.24: Congress Profile Photo: सूरत कोर्टाने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवल्यानंतर काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो बदलला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलले आहेत. मोदी आडनावावर टिप्पणी केल्याबद्दल गुजरातच्या सुरत कोर्टाने काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, ही शिक्षा 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. राहुल गांधी कोर्टाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. न्यायालयाचा निर्णय येताच एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो (Profile Photo) बदलला. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. हा ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा आहे, ज्यावर लिहिलं आहे की ‘डरो मत’.

प्रोफाईल फोटो बदलला | Congress Profile Photo

राहुल गांधी यांच्याबाबत निकाल येताच काँग्रेस नेत्यांनीही त्यांचे प्रोफाईल फोटो बदलले आहेत. इतकंच नाही तर काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलचा डीपीही बदलला आहे. या सगळ्या अकाऊंटवर राहुल गांधी यांचा ब्लक ॲण्ड व्हाईट फोटो लावण्यात आला आहे. त्यावर लिहिलं आहे की, ‘डरो मत’. राहुल गांधी यांचा हा फोटो भारत जोडो यात्रेदरम्यान काढण्यात आला होता.

View this post on Instagram

A post shared by Congress (@incindia)

राहुल गांधी गुरुवारी (23 मार्च) संध्याकाळी सुरतहून दिल्लीत पोहोचले. राहुल दिल्लीत पोहोचण्यापूर्वीच त्यांच्या घरासमोर कार्यकर्ते आणि समर्थक जमा झाले होते. सोनिया गांधीही मुलगा राहुल यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. हुतात्मा दिनानिमित्त भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना आदरांजली वाहताना राहुल गांधी यांनी निकालानंतर लगेचच ट्वीट केलं की, “मी भारतमातेच्या या शूर सुपुत्रांकडून सत्य आणि धैर्याला चिकटून देशासाठी निर्भयपणे लढायला शिकलो आहे.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here