पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वेबसाईटचे नूतनीकरण

0

ऑनलाईन पध्दतीने कोणत्याही पोलीस ठाण्यात देता येणार तक्रार

सोलापूर,दि.23: नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वेबसाईटचे उद्घाटन सोलापूर पोलीस आयुक्त हरीश बैजल (Solapur Police Commissioner Harish Baijal) यांच्या हस्ते करण्यात आले. शहर पोलिस आयुक्‍तालयाने नागरिकांच्या सोयीसाठी ड्रीम केअर डेव्हलपर्सच्या माध्यमातून नवे संकेतस्थळ http://www.solapurcitypolice.gov.in विकसित केले आहे. सिटिजन पोर्टलची लिंक या वेबसाईटला जोडल्याने शहरातील नागरिकांना घरबसल्या त्यावरून शहर अथवा राज्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यात तक्रार देता येणार आहे.

मराठी व इंग्रजी भाषेतून पोलिस आयुक्‍तालयाचे नवे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने नागरिकांना लॅपटॉप अथवा संगणकाच्या डेस्कटॉपवर, मोबाईलवर काही सेंकदात ते संकेतस्थळ उघडता येईल, असा विश्‍वास पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी व्यक्‍त केला. पोलिस आयुक्‍त ते सहाय्यक पोलिस आयुक्‍तांसह सर्व पोलिस ठाणी, पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे मोबाईल क्रमांक, पत्ता, चौकी, बीट मार्शलची देखील माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही वेबसाईट फेसबुक, ट्‌विटरशी जोडली आहे. आपले सरकार पोर्टलची लिंक त्या संकेतस्थळाला जोडल्याने नागरिकांना विविध प्रश्‍नांवर थेट सरकारकडेही तक्रार करता येणार आहे. स्वतंत्र ॲडमिन पॅनेल दिल्याने वेबसाईट दररोज अपडेट असेल, असे पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी स्पष्ट केले. या संकेतस्थळाचा डेमो सोमवारी (ता. 22) पोलिस आयुक्‍तांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहिला. यावेळी पोलिस उपायुक्‍त बांगर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, उपनिरीक्षक बायस, विवेक मेंगजी आदी उपस्थित होते.

संकेतस्थळाची ठळक वैशिष्ट्ये…

●वेबसाईट युझर फ्रेंडली असल्याने सर्वांसाठी वापरण्यास सोपी

●वाहतूक शाखेशी संबंधित दंड व नियमांची मिळणार माहिती

●महिला व नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी टिप्सही त्या संकेतस्थळावर

●पोलिस आयुक्‍तालयाचे अधिकार, पोलिस भरतीची माहिती, पोलिस विभागाच्या उपक्रमांची मिळणार माहिती


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here