सोलापूर,दि.23: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांनी मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत्त विशेष पुनरिक्षण घोषीत झालेला आहे. त्यानुसार दि. 30 ऑगस्ट, 2024 रोजी अंतिम मतदार यादी सर्व मतदान केंद्रावर, तहसिल कार्यालय, तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय वwww.ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच मतदान केंद्राच्या नवीन, स्थलांतरीत, नावात बदलाबाबत https://solapur.gov.in/en/election-branch/ut या वेबसाईटवर प्रसिध्दी देण्यात आलेली आहे, सोलापूर जिल्ह्यात नव्याने एकूण 124, नावात बदल 64, ठिकाण बदलात 151 अरो एकूण- 3723 मतदान केंद्र घोषित झालेली आहे, यावी व खालील बाबींबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी.
मतदारानी आपली नांवे मतदार यादीत आहे किंवा कसे याबाबत मतदारांनी खात्री करुन घ्यावी, तसेच चार अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी आपले नांव मतदार यादी फॉर्म 6 मरुन नांव नोंदणी करावी.
फॉर्म नं. 8 भरावा
ज्या मतदान केंद्रावर, एकाच कुटुंबातील मतदार यादीतील नांवे इतर मतदान केंद्रात विखुरलेले असल्यास त्यांनी त्या मतदान केंद्रावर नांव आणण्यासाठी फॉर्म 8 भरावेत, त्यामध्ये मतदान केंद्रास नव्याने जो अनुक्रमांक देण्यात आलेला आहे तो अचूक पध्दतीने फॉर्ममध्ये भरण्यात यावा. त्यासाठी https://solapur.gov.in/en/election-branch/ या वेबसाईटवर प्रसिध्दी केलेल्या मतदान केंदाच्या यादीचा आधार घेण्यात यावा.
तर फॅार्म नं. 6 भरावा
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 व्या मतदानांदिवशी ज्या मतदारांची नांवे मतदार यादीत आढळून आलेली नाहीत अथवा वगळलेली गेलेली असल्याने ज्या मतदारांना मतदान करता आले नाही, अशा मतदारांची पडताळणी करण्यात आली असून अशा मतदारांकडून फॉर्म नं. 6 मरुन घेऊन त्यांची नांचे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. तरी देखील अद्यापही कोणत्या मतदारास आपले नांव मतदार यादीत नाही असे वाटत असेल तर त्यांनी आपआपल्या विधानसभा मतदारसंघामधील निवडणूक शाखेशी (तहसिल कार्यालय) संपर्क साधून नांव आहे अगर कसे याची खात्री करुन नांव नसल्यास फॉर्म नमुना क्र. 6 भरुन द्यावा.
सोलापूर जिल्हयात एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1350 मतदार संख्या ठेवणेबाबत मा. भारत निवडणूक आयोगाकडून निर्देश प्राप्त झाल्याने त्याप्रमाणे कार्यवाही करुन खालीलप्रमाणे मतदार यांचे लगतच्या इतर मतदान केंद्रात नावे स्थलांतरीत करण्यात आलेली आहे. व अशी 124 नवीन मतदान केंद्रे करण्यात आलेली आहेत याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे-
विधानसभा मतदार संघाचे क्रमांक व नांव – 244 करमाळा – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे -342 -,प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 5, ठिकाणात बदल 16 , विलिनीकरण 9 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 347.
245 माढा – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे -341 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 14 , ठिकाणात बदल 18 , विलिनीकरण 2 , नावात बदल 14 , एकुण मतदान केंद्रे 355 ,
246 बार्शी – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 329 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 4 , ठिकाणात बदल 0 , विलिनीकरण 14 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 333
247 मोहोळ – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 330 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 6 , ठिकाणात बदल 18 , विलिनीकरण 11 , नावात बदल 26 , एकुण मतदान केंद्रे 336
248 सोलापूर शहर – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 278 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 11 , ठिकाणात बदल 25 , विलिनीकरण 19 , नावात बदल 10 , एकुण मतदान केंद्रे 289
249 सोलापूर मध्य. – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 290 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 14 , ठिकाणात बदल 20 , विलिनीकरण 27 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 304
250 अक्कलकोट – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 369 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 21 , ठिकाणात बदल 5 , विलिनीकरण 15 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 390
251 दक्षिण सोलापूर – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 346 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 16 , ठिकाणात बदल 2 , विलिनीकरण 43 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 362
252 पंढरपूर – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 337 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 20 , ठिकाणात बदल 22 , विलिनीकरण 50 , नावात बदल 8 , एकुण मतदान केंद्रे 357
253 सांगोला – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 299 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 6 , ठिकाणात बदल 22 , विलिनीकरण 17 , नावात बदल 0 , एकुण मतदान केंद्रे 305
254 माळशिरस – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 338 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 7 , ठिकाणात बदल 3 , विलिनीकरण 19 , नावात बदल 6 , एकुण मतदान केंद्रे 345
एकुण – पूर्वी असलेली मूळ मतदान केंद्रे 3599 , प्रस्तावित नवीन मतदान केंद्र 124 , ठिकाणात बदल 151 , विलिनीकरण 226 , नावात बदल 64 , एकुण मतदान केंद्रे 3723
वरीलप्रमाणे मतदान केंद्रामध्ये बदल झालेले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर कुमार आशीर्वाद, यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, त्यांनी आपली व आपल्या कुटुंबातील सर्व पात्र मतदारांची नांवे वरीलप्रमाणे बदल झालेल्या मतदान केंद्रावरील मतदार यादीमध्ये असलेबाबत खात्री करावी व बदल झालेल्या ठिकाणांची नोंद घ्यावी तसेच कुटुंबातील ज्या पात्र मतदारांची नोंदणी अद्यापही झालेली नाही, अशा सर्व नव मतदारांची नांवे नोंदणी करून घ्यावी.
तसेच, सर्व नागरीकांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपली नांवे, फोटो, पत्ता व इतर बाधी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत. ज्यांच्या दुरुस्ती असतील त्यानी दुरुस्ती करुन घ्यावी व ज्यांच्या नागरीकाची नावे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन, बीएलओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत, व आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मरादान करण्याने राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असेही जाहीर आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांनी केले आहे.