मुंबई,दि.९: CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यात शेतकरी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्यासह महिलांना मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला | CM Eknath Shinde On Uddhav Thackeray
‘देवेंद्र फडणवीसांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. आरोग्य योजना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांकडे बोलायला जागा नाही, देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला आहे, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
आम्ही महिलांसाठी एसटी ५० टक्के सवलतीमध्ये दिली. शेतकऱ्यांसाठी नमो योजना सुरू केली. या योजनेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे, आम्ही जनतेला गाजर हलवा तर देतोय त्यांनी स्वत:च खाल्ले दुसऱ्यांना काहीच दिले नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
अर्थसंकल्प म्हणजे गाजर हलवा
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. “महाविकास आघाडीने आपल्या अर्थसंकल्पात जे मुद्दे मांडले होते, त्याच मुद्द्यांवर आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आम्ही सत्तेत असताना केंद्रातील सरकार आमच्या बाजूचे नव्हते त्यामुळे केंद्राकडून येणारा GST ता निधी कायम थकबाकीत असायचा. नेहमी सरासरी २५ हजार कोटींच्यापेक्षा जास्तीची थकबाकी शिल्लक असायची. आता सरकारला सहा महिने झालेत. महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार कसा कारभार करत आहे हे साऱ्यांनाच माहिती आहे. अवकाळी पावसाने हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर एकही माणूस पंचानामे करायला गेला नाही. अजूनही काही गोष्टी मला समजल्या आहेत. अवकाळी पावसाप्रमाणाचे आज मुंबईत गडगडाट झाला. पण गरजेल तो बरसेल का असा सध्याचा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे हा ‘गाजर हलवा’ अर्थसंकल्प आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पावर मत व्यक्त करत सरकारची खिल्ली उडवली.