पुणे,दि.17: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेची औपचारिक सुरुवात पुण्यातून करण्यात आली आहे. यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहील. उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही बळ दिलं तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील. दोन हजार होतील, अडीच हजार होतील, अडीच हजाराचे तीन हजार होतील. या सरकारची ताकद वाढली तर तीन हजारापेक्षा जास्त देण्याची ताकद आली तर आम्ही हात आखडता घेणार नाही. सरकार तुमचं आहे. देण्याची नियत लागते. दानत लागते. ती आमच्या सरकारकडे आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही ट्रायल रन घेतला, आम्ही आधी एक रुपया टाकणार होतो, मात्र विरोधी पक्षाने परत टीका केली असती. अनेक महिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू बघायला मिळालेत . विरोधक म्हटलेत बहिणीचे ठीक पण. लाडक्या भावाचे काय? कधी भावाचा विचार केला का यांनी? पण आम्ही लाडक्या भावासाठीही योजना आणली आहे, असं ते म्हणाले.