Devendra Fadnavis | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय 

0

मुंबई,दि.३०: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच मोठा निर्णय घेतला आहे. पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलैला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि मोर्चात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. हिंदी सक्तीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच मोठा निर्णय 

महाराष्ट्रात हिंदी सक्तीला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येत विरोध दर्शवला होता. राज्यातील वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेबाबतचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पावसाळी अधिवेशन आजपासून (दि.३०) सुरू होत आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदपार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषा धोरणाचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली आहे. त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात कुठल्या वर्गापासून लागू करावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या समितीच्या अहवालानंतर त्रिभाषा सूत्र लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here