संभाजीराजे छत्रपती यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑफर

0

मुंबई, दि.21: संभाजीराजे छत्रपती ( SAMBHAJIRAJE CHATRPATI) यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑफर दिली आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने आणखी एक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला आहे. तर, संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांनी काल अपक्ष आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आठ अपक्ष आमदार उपस्थित होते, अशा माहिती मिळतेय.

राज्यमंत्री बच्चू कडू ( BACCHU KADU ), राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर ( RAJENDRA YEDRAVKAR ), आमदार आशिष जयस्वाल ( ASHISH JAISWAL ), नरेंद्र भोंडे ( NARENDRA BHONDE ), किशोर जोरगेवार ( KISHOR JOGREKAR ), विनोद अग्रवाल ( VONOD AGRAWAL ), मंजुळा गावित ( MANJULA GAVIT ) आणि गीता जैन ( GEETA JAIN ) हे आमदार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत विचार विनिमय करण्यात आला.

यातील बव्हंशी आमदारांनी संभाजीराजे किंवा अन्य बाहेरच्या उमेदवारास संधी देण्यापेक्षा शिवसेनेतीलच नेत्यांना संधी द्या. आपण जो निर्णय घ्याल त्यासोबत आम्ही राहू असे सांगितल्याची माहिती मिळतेय. चंद्रकांत खैरे ( CHANDRAKANT KHAIRE ), शिवाजीराव आढळराव पाटील ( SHIVAJIRAO ADHALRAO PATIL ) यांचीही नवे चर्चेत पुढे आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भेट घेतली. यावेळी ‘आधी शिवबंधन बांधा, मगच उमेदवारी देण्याबाबत विचार करू’ असे सांगितले अशी माहिती मुख्यमंत्री यांनीच दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

संभाजीराजे यांनी वाटल्यास समर्थकांशी चर्चा करावी आणि आपला निर्णय कळवावा. यासाठी दोन दिवस वाट पाहू, असेही मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले असे या सूत्रांनी सांगितले. संभाजीराजे यांनी शिवबंधन बांधण्यास नकार दिला तर शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल असेही या सूत्रांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here