‘भाजपा ऑपरेशन लोटसच्या तयारीत…’ मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा दावा

0

बंगळुरू,दि.13: लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा दक्षिणेकडील राज्यात ऑपरेशन लोटस चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी काँग्रेस आमदारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपाने आपल्याला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भाजप लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी दक्षिणेकडील राज्यात ऑपरेशन लोटस चालवण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी त्यांनी 50 कोटींची ऑफर दिली होती.

आमचे आमदार आम्हाला सोडणार नाहीत

लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसचे सरकार पडणार का, असा प्रश्न सिद्धरामय्या यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर सिद्धरामय्या म्हणाले की नाही, हे शक्य नाही कारण आमचे आमदार आम्हाला सोडणार नाहीत. आमचा एकही आमदार पक्ष सोडणार नाही. ते गेल्या वर्षभरापासून माझे सरकार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

आमदारांना 50 कोटींची ऑफर

त्यांनी आमच्या आमदारांना 50 कोटी रुपयांची ऑफर दिली होती, पण त्यांचे प्रयत्न पूर्ण होऊ शकले नाहीत. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल.

आरोप फेटाळून लावले

दरम्यान, इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना भाजप खासदार एस प्रकाश यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

केवळ एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी ते वारंवार असे आरोप करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारच्या मुद्द्यांवर आणि उपलब्धींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मुख्यमंत्री खोटे आरोप करत आहेत. भाजप लोकसभा निवडणुकीत सर्व 28 जागा जिंकण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, तर सिद्धरामय्या केवळ निवडणुकीनंतर आपला पाय रोवण्यावर भर देत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here