राजा असूनही लोकशाही पध्दतीने राज्य करणारा राजा

0

सोलापूर,दि.6: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा राज्याभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्यावतीने महाराजांच्या मूर्तीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करून तसेच मिठाईवाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित शिवशंभूप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या अर्थात स्वराज्य दिनाच्या शिवमय शुभेच्छा दिल्या.

6 जून 1674 या सुवर्ण दिनी सातशे वर्षाच्या गुलामीवर प्रहार करून तमाम सुलतानांच्या व राज्यभिषेकाला विरोध करणाऱ्याच्या छाताडावर पाय देऊन शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण करून आपले राज्याभिषेक केले खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे प्रणेते होते असे मत श्याम कदम यांनी व्यक्त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, रमेश चव्हाण, वैभव धुमाळ, लखन गायकवाड, राजेंद्र माने, रुपेश शिरसावलगी, शेखर स्वामी तुळशीराम राठोड, सिद्धाराम कोरे, ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here