Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये शांततेला गालबोट, विरोधकांचे सरकारकडे बोट

0

मुंबई,दि.30: Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला निमंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती. अफवांवर विश्वास ठेवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

संजय राऊत यांची टीका | Chhatrapati Sambhaji Nagar News

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, या राड्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकावर टीकास्र सोडलं आहे. या घटनेला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“राज्यात अशांतता निर्माण करणं, हा या सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात अशांतता निर्माण करणं, हा शिंदे सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने नाराजी दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

संभाजीनगर येथे २ एप्रील रोजी महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमिवर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) म्हणाले की, महाराष्ट्रात अराजकता निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचं काम मिंधे सरकार करत आहे, मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा एकही जातीय दंगल झाली नाही, पण आता इतक्या झाल्या की विचारू नका. गृहमंत्री कुठं असतात माहिती नाही. गृहमंत्री आणि सरकारचं हे अपयश आहे.खैरे पुढे बोलताना म्हणाले की, काल हा प्रकार झाला, आज रामनवमी आहे. यामुळे संपूर्ण देशात दंगलीचं वातावरण होईल. महत्वाचं म्हणजे हा २ तारखेला जो महाविकास आघाडीचा मेळावा डिस्टर्ब करण्याचा हा मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. रामनवमी होऊ नये, मेळावा होऊ नये म्हणून कालचा प्रकार झाल्याचे खैरे यावेळी म्हणाले.

खैरे म्हणाले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सगळे दोस्त आहेत. महानगर पालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचं प्लॅनिंग आहे, देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत आणि त्यांनी हे राजकारण करून महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरलं आहे, असेही खैरे यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.कालच्या घटनेचा महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर काही फरक पडेल का याबद्दल विचारले असात खैरे म्हणाले की याचा अजिबात फरक पडणार नाही. इतके मराठवाड्याचे लोक येतील की ते पाहूनच लोक पळून जातील. आज संध्याकाळ पर्यंत यांना पकडलं पाहीजे असेही खैरे यावेळी म्हणाले.हे पोलिसांपेक्षा सरकारचं अपयश आहे, कारण पोलिसांच्याच गाड्या जाळल्या त्यांनी यावर कारवाई केली पाहीजे असेही खैरे यांनी यावेळी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here