शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीची बैठक संपन्न

0

सोलापूर,दि.9: 16 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीची बैठक हॉटेल सह्याद्री येथे पार पडली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस ज्येष्ठ सदस्य गोवर्धन गुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 वा राज्यभिषेक दिनानिमित्त 16 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे मुख्य संयोजक शिरीष जगदाळे यांनी दिली. राज्याभिषेक समितीचे यंदा 9 वे वर्ष आहे. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ठीक नऊ वाजता ध्वजवंदन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक कार्यक्रम होणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यास विविध सन्माननीय अतिथी यांच्या सत्कार करण्यात येणार आहे, तसेच आनंदोत्सव म्हणून समितीचे वतीने मिठाईवाटप करण्यात येणार आहे. 

त्यानंतर सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सोलापुरातील शिवशंभु प्रेमींनी या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे शिरीष जगदाळे यांनी केले आहे.

यावेळी राज्याभिषेक समितीचे शिरीष जगदाळे, अमोल जाधव, बाळासाहेब गायकवाड, गोवर्धन गुंड, प्रकाश ननवरे,  श्याम कदम, सचिन साळुंखे, संभाजी राजे भोसले, अजय सोमदळे, छत्रुघन माने, संजय पारवे, संजोग सुरतगावकर, श्रेयस माने, शेखर जगदाळे, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here